पंतप्रधान कार्यालय

‘फोनी चक्रीवादळ’ सज्जतेच्या आढाव्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आढावा

Posted On: 02 MAY 2019 4:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘फोनी’ चक्रीवादळासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिव, अतिरिक्त प्रधान सचिव, गृह सचिव तसेच भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, राष्ट्रीय आपत्ती मदत पथक तसेच पंतप्रधान कार्यालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांना वादळाच्या संभाव्य वाटचालीबाबत तसेच हाती घेण्यात आलेल्या सावधानता आणि पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली.

या तयारीमध्ये पुरेशा साधनसामुग्रीची व्यवस्था, एनडीआरएफ तसेच सैन्य दलाची पथकं तैनात करणे, पिण्याचे पाणी पुरवण्याची व्यवस्था, वीज आणि टेलिकॉम सेवा पूर्ववत करण्यासाठीची प्रणाली आदींचा समावेश आहे.

उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वादळाचा तडाखा बसणाऱ्या राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याविषयी आणि ज्याप्रमाणे आवश्यकता भासेल त्याप्रमाणे मदत आणि बचाव कार्यासाठी परिणामकारक पावलं उचलण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1571492) Visitor Counter : 104


Read this release in: English