उपराष्ट्रपती कार्यालय

जातीवाद आणि सांप्रदायिकतेवर आधारित वृत्तांकन टाळण्याची उपराष्ट्रपतींची प्रसारमाध्यमांना सूचना


उपराष्ट्रपतींनी गुंफले डॉ. राजाराम जयपुरीया स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

प्रविष्टि तिथि: 30 APR 2019 5:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 एप्रिल 2019

 

सार्वजनिक जीवनात जात आणि पैशाला वाढते महत्व मिळत असल्याबद्दल उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे. जातीवाद आणि सांप्रदायिकतेला महत्व मिळेल, अशा प्रकारचे वृत्तांकन टाळण्याचे विशेषत: निवडणूक काळात ते टाळण्याची सूचना उपराष्ट्रपतींनी केली आहे.

नवी दिल्ली येथील डॉ. भीमराव आंबेडकर केंद्रात शिक्षण, उद्योजकता आणि मूल्ये यावरील डॉ. राजाराम जयपुरीया स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते आज बोलत होते.

चारित्र्य, गुणवत्ता, क्षमता आणि आचरण या आधारे नागरिकांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे. माध्यमांनीही लोकप्रतिनिधींच्या कामगिरींवर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सदनाची कार्यवाही रोखल्याच्या वृत्तांकनाऐवजी माध्यमांनी लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधीगृहात विचारलेले प्रश्न, उपस्थित केलेले सार्वजनिक प्रश्न, नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांची कटिबद्धता या मुद्यांना महत्व दिले पाहिजे, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले.

शैक्षणिक संस्थांनी कौशल्य विकास, रोजगार कौशल्ये आणि नीतीमूल्यांना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1571350) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English