संरक्षण मंत्रालय

आयएनएस विक्रमादित्य नौकेवर आग, युद्धनौकेचे कुठलेही नुकसान नाही, नौदलाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू

प्रविष्टि तिथि: 26 APR 2019 4:18PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2019

 

आयएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलाची नौका आज सकाळी कारवार बंदरात प्रवेश करत असताना तिला आग लागली. जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करत आग आटोक्यात आणल्यामुळे जहाजाचे कोणतेही नुकसान झाले नाही.

लेफ्टनंट कमांडर डी. एस. चोहान यांच्या नेतृत्वाखाली चमुने आग विझवली. मात्र, आगीमुळे पसरलेल्या धुराचा त्रास होऊन लेफ्टनंट कमांडर डी. एस. चोहान बेशुद्ध झाले. त्यांना कारवार येथील आएनएचएस पतंजली या नौदलाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1571203) आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English