पंतप्रधान कार्यालय

वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश

Posted On: 22 APR 2019 5:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 22 एप्रिल 2019

 

वसुंधरा दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिलेला संदेश पुढीलप्रमाणे-

‘आज वसुंधरा दिवस आहे. भूमातेला आपण वंदन करतो आहोत. गेली अनेक वर्षे ही महान वसुंधरा विशाल जैवविविधतेचे निवासस्थान राहिले आहे. या वसुंधरेच्या म्हणजेच आपल्या धरणी मातेच्या भल्यासाठी तिचे पुत्र म्हणून आपलेही मोठे कर्तव्य असून ती अधिक समृद्ध करण्यासाठीच्या आमच्या कटिबद्धतेचा मी पुनरूच्चार करतो. या पृथ्वीसाठी शाश्वत विकास आणि हवामान बदलाशी लढा देण्याचे कर्तव्य आम्ही पुढेही करत राहू.’

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1570989) Visitor Counter : 108


Read this release in: English