संरक्षण मंत्रालय

नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा थायलंडला भेट देणार

Posted On: 16 APR 2019 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2019

 

नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा 17 ते 19 एप्रिलदरम्यान थायलंडला भेट देणार आहेत. भारत आणि थायलंड मधले सागरी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच वृद्धींगत करणे आणि संरक्षण सहकार्यासाठी नव्या संधींचा शोध घेणे हा या भेटीचा उद्देश आहे.

या भेटीदरम्यान ॲडमिरल सुनील लांबा, थायलंडच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल पी बेनयासरी, रॉयल थाई नौदलाचे कमांडर इन चीफ लियुचाई रुद्दित आणि वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

रॉयल थाई नौदल आणि रॉयल थाई सशस्त्र दलाच्या बँकाक इथल्या मुख्यालयाला आणि फुकेतमधल्या तिसऱ्या नौदल एरिया कमांडलाही ते भेट देतील.

भारत आणि थायलंड यांच्यात अनेक शतकांपासून ऐतिहासिक संबंध आहेत. उभय देशांदरम्यान 1947 मधे औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

 

 

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 



(Release ID: 1570792) Visitor Counter : 80


Read this release in: English