मंत्रिमंडळ

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि ब्राझील यांच्यातल्या सामंजस्य कराराबाबत मंत्रिमंडळाला माहिती

Posted On: 15 APR 2019 1:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

भारत आणि ब्राझील यांच्यात मे 2018 मधे स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाला माहिती देण्यात आली.

भारत आणि ब्राझील यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यता आणि कल्पकता या क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. जैवतंत्रज्ञान शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात ठोस धोरणात्मक आराखडा विकसित करणे हा याचा उद्देश आहे.

जैव औषध आणि आरोग्य, जैव-इंधन आणि जैव उर्जा, जैवविविधता, नॅनोटेक्नॉलॉजी या क्षेत्रात प्रामुख्याने सहकार्य करण्यात येणार आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 



(Release ID: 1570755) Visitor Counter : 71


Read this release in: English