मंत्रिमंडळ

भारत आणि कोरिया यांच्यात संयुक्त टपाल तिकिट जारी करण्याबाबतच्या सामंजस्य कराराची मंत्रिमंडळाला माहिती

Posted On: 15 APR 2019 1:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

भारत आणि कोरिया यांच्यात फेब्रुवारी 2019 मधे झालेल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘कोरियाची राणी – ह्यो ह्वांग ओक ऑफ कोरिया’ या संकल्पनेवर संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करण्याला भारताचे टपाल खाते, दूरसंवाद मंत्रालय आणि कोरियाचे टपाल आणि विज्ञान मंत्रालय यांनी मान्यता दिली आहे.

दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने ठरवलेल्या तारखेला 2019 च्या अखेरीस हे संयुक्त टपाल तिकीट जारी करण्यात येईल.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1570753) अभ्यागत कक्ष : 150
Read this releasein: English