मंत्रिमंडळ

भारत आणि डेन्मार्क यांच्यात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता

प्रविष्टि तिथि: 15 APR 2019 1:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपतटीय म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून काहीशा दूर पवन ऊर्जेवर विशेष लक्ष केंद्रीत करत नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत आणि डेन्मार्क यांच्यातल्या धोरणात्मक सहकार्य कराराला मान्यता देण्यात आली.

भारताचे नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि डेन्मार्कचे ऊर्जा आणि हवामान मंत्रालय यांच्यात मार्च 2019 मधे हा करार झाला आहे. भारतात नवीकरणीय ऊर्जेसाठी भारत-डॅनीश सेंटर ऑफ एक्सिलन्स निर्मितीसाठीच्या इरादा पत्रालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. उच्च दर्जाची पवन टर्बाइन, प्रभावी आणि कार्यक्षम पवन उद्योग विकसित करण्यासाठीच्या उपाय योजना, अपतटीय पवन प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी तांत्रिक क्षमता उभारणी या क्षेत्रात सहकार्य करण्यात येणार आहे.

या दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करण्यामुळे उभय देशातले द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होणार आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1570752) आगंतुक पटल : 101
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English