मंत्रिमंडळ

नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयात उपनियंत्रक आणि महालेखा परीक्षकासाठीच्या एका पदाच्या निर्मितीला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 15 APR 2019 1:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयात उपनियंत्रक आणि महालेखा परीक्षक वेतनमान-स्तर 17 या एका पदाच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. एसटीएस स्तरावरचे एक पद रद्द करुन हे पद निर्माण करण्यात आले आहे.

भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागा अंतर्गत विभिन्न माहिती प्रणाली देखरेख राज्य लेखाधिकाऱ्यांमधला समन्वय, राखण्याचे काम नियंत्रक आणि महालेखा परीक्षक करणार आहे.

या पदाच्या निर्मितीसाठी सुमारे 21 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1570751)
Read this release in: English