मंत्रिमंडळ

भारत आणि बोलिव्हिया यांच्यात भूविज्ञान आणि खनिज संसाधन क्षेत्रातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 15 APR 2019 1:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

भारत आणि बोलिव्हिया यांच्यात भूविज्ञान आणि खनिज संसाधन क्षेत्रात सहकार्य करण्यासाठीच्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. या करारावर मार्च 2019 मधे स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

प्रभाव –

खनिज संसाधन क्षेत्रात भारत आणि बोलिव्हिया यांच्यातल्या सहकार्यासाठी या सामंजस्य करारामुळे संस्थात्मक यंत्रणा निर्माण होणार आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 

 



(Release ID: 1570749) Visitor Counter : 68


Read this release in: English