मंत्रिमंडळ

दूरसंवाद क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि कंबोडिया यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Posted On: 15 APR 2019 1:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019

 

भारत आणि कंबोडिया यांच्यात दूरसंवाद क्षेत्रातल्या सहकार्यासाठी झालेल्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी देण्यात आली.

मार्च 2019 मधे या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

प्रभाव –

यामुळे दूरसंवाद क्षेत्रात, दोन्ही देशादरम्यानचे द्विपक्षीय सहकार्य आणि परस्पर सामंजस्य दृढ व्हायला मदत होणार आहे.

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1570748) अभ्यागत कक्ष : 137
Read this releasein: English