उपराष्ट्रपती कार्यालय
कमी कार्बन उर्त्सजन, हरित आणि हवामानाशी मिळता-जुळता नागरी पायाभूत ढाचा ही काळाची गरज – उपराष्ट्रपती
प्रविष्टि तिथि:
15 APR 2019 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2019
सौर ऊर्जेचा वापर, हरित क्षेत्राची वृद्धी आणि जलसंवर्धन यासारखे शाश्वत उपाय हे नगर नियोजनाचा अत्यावश्यक भाग बनवा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी नगर नियोजनकारांना केले आहे.
चौथ्या आरसीएपी काँग्रेसमधे ते आज नवी दिल्लीत बोलत होते. पालिका प्रशासनाने, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सुचवले.
आर्थिक विकास साधताना पर्यावरण संरक्षण विचारात घ्यायलाच हवे, असे मत व्यक्त करतांना जीवाश्म इंधनावरचे अवलंबित्व कमी करायला हवे, सौर ऊर्जेसारखे, ऊर्जेचे नवे स्रोत शोधायला हवेत, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
कार्बन उत्सर्जन स्तर कमी राखत विकास साधण्याचा दृष्टीकोन अवलंबावा, असे आवाहन त्यांनी विविध देशांतल्या प्रांताच्या आणि शहरांच्या प्रतिनिधींना केले. वायु-प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरांमधे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे, असंही ते म्हणाले.
हरित पायाभूत ढाचा ही सध्याच्या काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.
सुमारे तीस देशातले 200हून अधिक प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत.
N.Sapre/N.Chitale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1570662)
आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English