सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

फेब्रुवारी महिन्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

Posted On: 12 APR 2019 6:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2019

 

औद्योगिक उत्पादन निर्देशांकात फेब्रुवारी महिन्यात 2018 च्या फेब्रुवारीच्या तुलनेत 0.1 टक्का वाढ झाली आहे. वस्त्रप्रावरणे उत्पादन करणाऱ्या उद्योग गटाने सर्वात जास्त 19.3 टक्के सकारात्मक वाढ दर्शवली आहे. त्याखालोखाल खाद्यान्न उत्पादन करणाऱ्या उद्योग गटाचे 13.8 टक्के सकारात्मक वाढ दर्शवली आहे.

यंत्रसामग्री आणि साधन उत्पादन उद्योगगटाने उणे 12.8 टक्के अशी सर्वात जास्त नकारात्मक वाढ नोंदवली आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1570511) Visitor Counter : 132


Read this release in: English