संरक्षण मंत्रालय

सैन्यदल कमांडर्स परिषद

Posted On: 12 APR 2019 5:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2019

 

भारतीय लष्कराच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेतला महत्वाचा घटक असणारी सैन्यदल कमांडर परिषद नवी दिल्लीत 8 एप्रिल पासून सुरू आहे. महत्वाच्या धोरणात्मक निर्णयांची आखणी या द्वैवार्षिक परिषदेत करण्यात येते.

सुरक्षाविषयक सर्व पैलूंची या परिषदेत चर्चा करण्यात आली. सुरक्षाविषयक परिस्थिती यावरही विचारविमर्श झाला.

भारतीय सैन्यदल शांततामध्य सुरक्षाविषयक वातावरणासाठी कटिबद्ध आहे. भविष्यातला धोका, आव्हानं यांची समग्र दखल घेत दहशतवादाला थारा मिळणार नाही याची खातरजमा करण्यासाठी लष्कर कटिबद्ध असल्यावर परिषदेत भर देण्यात आला. सैन्यदलाची तत्परता, लष्कराच्या तीनही दलातली सुसूत्रता, मुत्सद्देगिरी, संयुक्त कवायती यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1570500) Visitor Counter : 145


Read this release in: English