माहिती आणि प्रसारण मंत्रालय
अमृतसरमधल्या जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्ष झाल्यानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
12 APR 2019 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 एप्रिल 2019
जालियनवाला बाग हत्याकांडाला शंभर वर्ष झाल्यानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चंदीगड क्षेत्रीय आऊटरिच ब्युरोने 11 ते 13 एप्रिल दरम्यान छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘स्वातंत्र्यलढ्यावरचे छायाचित्र प्रदर्शन’ या नावाच्या या प्रदर्शनात जालियनवाला बाग हत्याकांडाविषयीची चित्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे, लेख यांचा समावेश आहे. 13 एप्रिल 1919 मध्ये मारल्या गेलेल्या या लोकांच्या स्मरणार्थ स्मारक निर्मितीसाठी जमीन दान करण्याचे अवाहन महात्मा गांधी आणि अन्यजण करत आहेत हे दर्शविणाऱ्या छायाचित्राचाही यात समावेश आहे.
छायाचित्रांबरोबरच, भारताचा स्वातंत्र्य लढा आणि जालियनवाला बाग यावर फिल्म्स डिव्हिजन आणि दूरदर्शन यांनी निर्माण केलेला लघुपटही जनतेला दाखविण्यात येत आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1570485)
आगंतुक पटल : 304
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English