आयुष मंत्रालय

जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त परिषदेचे उद्‌घाटन

Posted On: 09 APR 2019 4:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  9 एप्रिल 2019

 

जागतिक होमिओपॅथी दिवसानिमित्त नवी दिल्ली येथे दोन दिवसांच्या परिषदेचे उद्‌धाटन आज आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. वैद्य राजेश कोटेचा यांनी केले. होमिओपॅथीचे जनक डॉ. क्रिश्चियन फ्रेडरिक सॅम्युअल हानेमान यांच्या जयंतीनिमित्त जागतिक होमिओपॅथी दिवस साजरा केला जातो.

‘आयुष’मध्ये संशोधनाच्या माध्यमातून विज्ञान आणि परंपरा यांच्यातील दरी सांधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. कोटेचा यांनी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात सांगितले. संशोधन, उत्पादन आणि उत्पादनाचा दर्जा वाढवून होमिओपॅथी वैद्य करण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

N.Sapre/S.kakde/P.Kor


(Release ID: 1570281) अभ्यागत कक्ष : 204
Read this releasein: English