उपराष्ट्रपती कार्यालय

असंसर्गजन्य आजारांमधे वाढ झाल्याबद्दल उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त

Posted On: 05 APR 2019 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2019

 

असंसर्गजन्य आजारांमधील वाढ ही चिंताजनक बाब असून, आधुनिक जीवनशैलीच्या धोक्यांबाबत लोकांना प्रशिक्षण करण्याचे आवाहन त्यांनी वैद्यकीय समुदायाला केले.

ते आज लखनौ इथे एका वैद्यकीय परिषदेच्या वार्षिक बैठकीला संबोधित करत होते. असंसर्गजन्य आजारांमधे 1990 ते 2016 या कालावधीत 30 टक्क्यांवरुन 55 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर याच काळात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण 61 टक्क्यांवरुन 33 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या 2017 सालच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.

वाढता तणाव, मधूमेह, रक्तदाब, अति प्रमाणात मद्यपान, धुम्रपान, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप हे घटक हृदयविकारांना कारणीभूत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. अकाली येणारे हृदयविकाराचे झटके रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आठवड्यातले पाच दिवस नियमितपणे चालणे, सायकलिंग, पोहणे, धावणे यासारख्यो व्यायाम केल्यास हृदयविकाराची शक्यता कमी करण्यास मदत होते, असे ते म्हणाले.

मुलांना शालेय दिवसांपासून मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण भागांमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधे किमान तीन वर्ष आरोग्य सेवा पुरविण्याची सूचना दिली.

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1570102) Visitor Counter : 187


Read this release in: English