संरक्षण मंत्रालय

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेबरोबर (CSIR) भारतीय नौदलाचा सामंजस्य करार

Posted On: 05 APR 2019 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2019

 

भारतीय नौदलासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या संयुक्त संशोधन आणि विकासासाठी भारतीय नौदल आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नौदलाचे व्हाईस ॲडमिरल जी.एस.पॅबी आणि सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर विज्ञान, आदी क्षेत्रात संशोधन आणि विकास कार्याला चालना मिळेल.

N.Sapre/S.Kane/D.Rane

 



(Release ID: 1570093) Visitor Counter : 194


Read this release in: English