वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
व्यापार आणि आर्थिक सहकार्यावरील भारत युक्रेन कृती गटाची चौथी बैठक नवी दिल्लीत संपन्न
Posted On:
02 APR 2019 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2019
व्यापार आणि आर्थिक सहकार्यावरील भारत युक्रेन कृती गटाची चौथी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव विद्युत बेहारी स्वईन यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. तर युक्रेनच्या आर्थिक व्यापार आणि विकास मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार संचालनालयाचे संचालक ओलेक्सी रोझकोव यांनी युक्रेनचे प्रतिनिधीत्व केले. बैठकीनंतर प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापार आणि सहकार्याचा आढावा, तांत्रिक नियमन क्षेत्रात सहभागी, खाजगी – सार्वजनिक भागिदारी, बँकिंग आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य आदींचा यात समावेश आहे.
N.Sapre/S.Kane/D.Rane
(Release ID: 1569990)
Visitor Counter : 156