संरक्षण मंत्रालय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या द्विपक्षीय सागरी सरावाला सुरुवात

प्रविष्टि तिथि: 02 APR 2019 4:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2019

 

AUSINDEX हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा द्विपक्षीय सागरी सराव विशाखापट्टणम येथे आजपासून सुरु झाला आहे. उभय देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य आणि आंतरसंचलन वृद्धिंगत करणे हा या सरावाचा उद्देश आहे. यामुळे दोन्ही नौदलांच्या कर्मचाऱ्यांना संवाद साधण्याची तसेच व्यावसायिक मते जाणून घेण्याची संधी मिळेल.

सप्टेंबर 2015 मधे विशाखापट्टणम इथे पहिला सागरी सराव आयोजित करण्यात आला होता.

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane

 


(रिलीज़ आईडी: 1569981) आगंतुक पटल : 289
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English