भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाकडून आंध्र आणि तेलंगणसाठी विशेष केंद्रीय पोलीस निरिक्षकांची नेमणूक
Posted On:
28 MAR 2019 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2019
भारतीय निवडणूक आयोगाने विवेक दुबे (भा.पो.से. आंध्र प्रदेश 1981, निवृत्त) यांचे नाव आगामी लोकसभा निवडणूकांदरम्यान पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यांसाठी केंद्रीय पोलीस निरिक्षक म्हणून निर्देशित केले आहे. या राज्यांसाठी आधी के. के. शर्मा (भा.पो.से. 1982, निवृत्त महासंचालक, सीमा सुरक्षा दल) यांचे नाव निर्देशित केले होते. मात्र त्यांना आंध्र प्रदेश आणि तेलंगण इथे नियुक्ती देण्यात आली आहे.
N.Sapre/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1569820)
अभ्यागत कक्ष : 160