उपराष्ट्रपती कार्यालय
देशाचा विकास आणि उन्नतीसाठी वृत्तसंस्थांनी सक्षम आणि भयमुक्त रीतीने कार्य केले पाहिजे – उपराष्ट्रपती
पत्रकारांनी आवाज विरहितांचा आवाज बनवा- उपराष्ट्रपती
माध्यमांनी उच्चस्तरीय व्यवसायीत्व अवलंबून, अचूकता आणि कुठलाही भेदभाव न करता बातमीला प्रसिद्धी द्यावी
‘दीपिका मल्याळम’ दैनिकाच्या 132 व्या स्थापना दिवसानिमित्त उपराष्ट्रपतींचे संबोधन
प्रविष्टि तिथि:
27 MAR 2019 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2019
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज दीपिका या पहिल्या मल्याळम दैनिकाच्या 132 व्या स्थापना दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, भारतासारख्या मोठ्या लोकशाही देशाच्या विकासासाठी माध्यमांनी भयमुक्त आणि सक्षमतेने कार्य करणे आवश्यक आहे. त्यांनी पत्रकारांना समाजाचा आरसा बनून आवाज विरहितांचा आवाज बना असे मार्गदर्शन केले
उपराष्ट्रपती म्हणाले की, वृत्त संस्थांची विश्वासहार्यता आणि जबाबदारी ही खरी आणि भयमुक्ततेने बातमीला प्रसिद्धी देणे ही आहे. ते पुढे म्हणाले की अचूक बातमी प्रसिद्ध करणं हे केवळ उद्दिष्ट न ठेवता सामाजिक आणि आर्थिक अन्याय झाला असल्यास त्याला प्रकाशझोतात आणणे आद्य कर्तव्य आहे.
नायडू पुढे म्हणाले की, वृत्तपत्रांचे देशाबद्दलचे दायित्व हे केवळ बातम्या प्रसिद्ध करणे नसून देशाच्या विकासाला प्राथमिकता देऊन धोरणांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला मदत करणे हे आहे. त्यांनी माध्यमांना समाजात कायदेशीर बाबी बद्दल जागृकता निर्माण करण्याचे आव्हान केले.
ते पुढे म्हणाले की निवडणुकांच्या कार्यकाळात माध्यमांची भूमिका ही कठीण आणि महत्त्वाची असते. मतदारांचे मतस्वातंत्र्य हे आबादीत ठेवण्यासाठी भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी माध्यमांनी महत्त्वाची भूमिका वठवायला पाहिजे असे नायडू म्हणाले.
पारंपारिक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वर्चस्व आत्तापर्यंत होते परंतु अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांचे सीमारेषाची व्याख्या बदलली असून आता नवीन माध्यमे जसे ऑनलाइन पत्रकारिता सोशल मीडिया हे नव्याने पुढे येत आहेत सोशल मीडिया कडे प्रचंड बातम्यांच्या प्रसारणाची क्षमता असून फेक न्युज सुद्धा अंतर्भूत आहेत याकडे लक्ष देण्याचे आव्हान उपराष्ट्रपतीनी केले.
राष्ट्र दीपिका मर्यादितचे अध्यक्ष डॉ. फ्रान्सिस क्लेतस, दीपिकाचे मुख्य संपादक, बॉबी अलेक्स मन्नमप्लाकल, दिपीकाचे व्यवस्थापकीय संचालक, फादर मॅथ्यू चंद्रकणनेल, जॉर्ज कालीवायलाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
B.Gokhale/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1569762)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English