शिक्षण मंत्रालय

संशोधनासाठी विषयांचे पर्याय निवडण्याबाबत मर्यादा घालण्यासंदर्भात कोणतेही दिशानिर्देश नाहीत

Posted On: 25 MAR 2019 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मार्च 2019

 

संशोधनासाठी विषयांचे पर्याय निवडण्याबाबत मर्यादा घालण्यासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोणतेही दिशानिर्देश जारी केलेले नाहीत.

यासंदर्भात काही माध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे. संशोधनामध्ये स्वातंत्र्याच्या तत्वावर सरकारचा विश्वास आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

संशोधनात मागे असलेले 11 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक गेल्यावर्षी झाली होती. संशोधन सुधारण्याबाबतचा आराखडा यावेळी सादर झाला होता. तसेच राष्ट्रीय प्राधान्यांशी संबंधित मुद्यांवर अधिक संशोधनाबाबत चर्चा यावेळी झाली होती. संशोधन सुधारण्यासाठी आणि विस्तार व्हावा यासाठी सरकार प्रोत्साहन कायम दिले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

 

 

N.Sapre/S.Kakade/D. Rane

 



(Release ID: 1569429) Visitor Counter : 131


Read this release in: English