भारतीय निवडणूक आयोग

सोशल मीडिया प्रतिनिधींसोबत निवडणूक आयोगाची बैठक

Posted On: 19 MAR 2019 7:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 19 मार्च 2019

 

सोशल मीडिया तसेच इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींसोबत आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या वापराबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली.

निवडणूक आचारसंहिता आगळीवेळी आणि ऐतिहासिक असून निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व राजकीय पथ त्याचे पालन करतात, असे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी सांगितले.

विविध राजकीय पथ आणि निवडणूक आयोग यांच्यात झालेल्या एकवाक्यतेचा परिणाम म्हणजे आचारसंहिता असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियानेही सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी आणि भविष्यात कायमस्वरुपी आचारसंहिता आखण्याचे आवाहन अरोरा यांनी केले.

सोशल मीडियाच्या ‘वर्तणूकी’ संदर्भात विकास करण्यासाठी ही बैठक अतिशय महत्वपूर्ण असल्याचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा म्हणाले. सुसंस्कृत समाजाने स्वत:हून घातलेले निर्बंध महत्वपूर्ण असून कुठलयाही निर्बंधांप्रमाणेच परिणामकारक कार्य करतात असेही त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोग स्वतंत्र, प्रामाणिक आणि नैतिक निवडणुकांसाठी कटीबद्ध असल्याचे निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा म्हणाले. सोशल मीडियाचा सहभागाचा दृष्टीकोन निवडणूक आयोगाला आपले लक्ष्य साध्य करण्यात मोठे सहाय्यकारी ठरेल असेही त्यांनी सांगितले.

राजकीय जाहिरातींवरील खर्चाबाबत पारदर्शकता, विविध संघटनांबाबत वेगाने कारवाई करण्यासाठी तक्रार कक्ष आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

इंटरनेट ॲण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया तसेच फेसबुक, व्हॉटस्ॲप, ट्विटर, गुगल, शेअर चॅट, टिकटॉक आणि बिंगो टिव्ही यासारख्या सोशल मीडिया संस्थांचे प्रतिनिधीही या बैठकीला उपस्थित होते.

सोशल मीडियासाठी उद्या संध्याकाळपर्यंत नैतिकता संहिता तयार करण्याविषयी यावेळी एकमत झाले.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1569166) Visitor Counter : 192


Read this release in: English