संरक्षण मंत्रालय

रिअर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी सागरी प्रशिक्षण फ्लॅग ऑफिसर म्हणून कार्यभार स्वीकारला

Posted On: 18 MAR 2019 3:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 मार्च 2019

 

रिअर ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी सागरी प्रशिक्षण ध्वजाधिकारी म्हणून कोची येथे कार्यभार स्वीकारला. संपर्क आणि इलेक्ट्रॉनिक युद्धपद्धती यात तज्ञ असलेले रिअर ॲडमिरल स्वामीनाथन 1 जुलै 87 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले.

भारतीय नौदलाच्या आयएनएस विद्युत, आयएनएस विनाश, आयएनएस कुलीश, आयएनएस म्हैसूर, विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यचे सारथ्य त्यांनी केले आहे.

सागरी प्रशिक्षण ध्वजाधिकारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी स्वामीनाथन यांनी दक्षिण नौदल मुख्यालयात मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) म्हणून काम करत भारतीय नौदलाच्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1569050) अभ्यागत कक्ष : 114
Read this releasein: English