आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
वेस्ट निले व्हायरसच्या नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आरोग्य विभागाकडून आढावा
प्रविष्टि तिथि:
14 MAR 2019 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2019
केरळमधल्या मलप्पुरम जिल्ह्यात सात वर्षाच्या एका मुलाला वेस्ट निले व्हायरस या डासांमुळे होणाऱ्या आजाराची लागण झाल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री परिस्थितीवर लक्ष ठेवत असून त्यांनी या खात्यांच्या सचिवांसमवेत परिस्थितीचा आढावाही घेतला. या आजाराला रोखण्यासाठी केरळला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला सतर्क करण्यात आले असून केंद्र आणि राज्यस्तरावरही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. देशाच्या इतर भागात या व्हायरसचा प्रसार झाल्याचे वृत्त नाही.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1568854)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English