भारतीय निवडणूक आयोग

गुजरात विधानसभेच्या दोन जागांसाठीच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम

Posted On: 14 MAR 2019 4:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 मार्च 2019

 

गुजरात विधानसभेच्या ध्रांगधरा आणि मानवादर या दोन मतदासंघातल्या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासाठीचा निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे-

येत्या 28 मार्चला अधिसूचना जारी होणार असून 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 5 एप्रिलला अर्जाची छाननी होईल तर 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 23 एप्रिलला मतदान होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होईल. या पोटनिवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1568829) Visitor Counter : 152


Read this release in: English