संरक्षण मंत्रालय
शौर्य आणि विशिष्ट सेवा पदके राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान
प्रविष्टि तिथि:
14 MAR 2019 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2019
राष्ट्रपती आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख राम नाथ कोविंद यांनी, अतुलनीय शौर्य, कर्तव्याप्रती सर्वोच्च निष्ठा यांचे दर्शन घडविणाऱ्या सैन्य दलातल्या तीन जणांना कीर्तीचक्राने तर 15 जणांना शौर्य चक्राने सन्मानित केले. दोन जणांना कीर्तीचक्र मरणोत्तर तर एक शौर्य चक्र मरणोत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रपतींनी यावेळी सैन्यदलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 15 परम विशिष्ट सेवा पदके, एक उत्तम युद्ध सेवा पदक, 25 अती विशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित केले.
सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफल्सच्या 44 व्या तुकडीतल्या राजपुत रेजीमेंटच्या व्रम्हा पालसिंह यांना आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे राजेंद्र कुमार नैन यांना मरणोत्तर कीर्ती चक्र तर धनावडे रवींद्र बबन यांना शौर्य चक्र मरणोत्तर देण्यात आले आहे.
मेजर तुषार गऊबा यांना कीर्तीचक्राने सन्मानित करण्यात आले. तर मेजर आदित्य कुमार, कॅप्टन वर्मा जयेश राजेश, प्रफुल्ल कुमार, कॅप्टन पी राजकुमार, कॅप्टन अभिनव कुमार चौधरी, लान्स नायक अयुब अली, मेजर पवन गौतम, नायब सुभेदार विजयकुमार यादव, हेड कॉन्स्टेबल ए एस कृष्णा, कॅप्टन कनिंदर पॉल सिंह यांना शौर्यचक्राने गौरवण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात आज हे सन्मान प्रदान करण्यात आले.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1568823)
आगंतुक पटल : 250
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English