पंतप्रधान कार्यालय

तुर्कीच्या राष्ट्रपतींचे पंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संभाषण

Posted On: 11 MAR 2019 3:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 मार्च 2019

 

तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तैयप एर्दोगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संवाद साधला.

भारतात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या मृतांप्रती एर्दोगन यांनी शोक व्यक्त केला आणि यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी कामना व्यक्त केली.

दहशतवाद हा जागतिक आणि सुरक्षिततेला एक मोठा धोका आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. सर्व राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात तातडीने आणि ठोस कारवाई करावी यावर पंतप्रधानांनी भर दिला.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1568652) Visitor Counter : 62


Read this release in: English