श्रम आणि रोजगार मंत्रालय
पीएमएसवायएममध्ये सहभागी होणाऱ्या असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांची संख्या येत्या 31 मार्चपर्यंत 1 कोटीवर जाण्याची अपेक्षा-संतोषकुमार गंगवार
मुंबईतल्या अंधेरी येथे ईएसआयसी नगरचे गंगवार यांच्या हस्ते भूमिपूजन
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2019 5:50PM by PIB Mumbai
मुंबई, 8 मार्च 2019
कामगारांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून गेल्या साडेचार वर्षात सरकारने किमान वेतनात वाढ करण्यासह कामगारांसाठीच्या अनेक लाभात वाढ केली आहे असे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी म्हटले आहे. मुंबईत अंधेरी उपनगरात ईएसआयसी अर्थात एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या क्वार्टर्ससाठी भूमिपूजन करताना ते आज बोलत होते.

असंघटीत क्षेत्रात 40 कोटीपेक्षा जास्त कामगार काम करत असून त्यांना भविष्य निर्वाह निधीसारखे लाभ मिळत नाहीत हे लक्षात घेऊन त्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शनचा लाभ मिळावा या दृष्टीने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू करण्यात आली असंघटीत क्षेत्रातले 15 लाखापेक्षा जास्त कामगार या योजनेत सहभागी झाले असून येत्या 31 मार्चपर्यंत ही संख्या एक कोटीहून अधिक होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील कर्मचारी राज्य विमा योजना
महाराष्ट्रात 11.07.1954 रोजी नागपूर येथे एका केंद्रात ईएसआय योजना प्रथम सुरू करण्यात आली. त्यानंतर 22 जिल्ह्यात या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली.

देशातील ईएसआय योजना
देशात कानपूर आणि दिल्ली या दोन औद्योगिक केंद्रात 24 फेब्रुवारी 1952 मध्ये ईएसआय योजना सुरू करण्यात आली.

N.Sapre/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1568329)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English