पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन उपस्थितांना संबोधित केले

Posted On: 08 MAR 2019 4:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. प्रतिकात्मक भूमिपूजनानंतर त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराजवळ उपस्थितांना संबोधित केले. काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाशी जोडले जाणे म्हणजे आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी निष्ठेने काम केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. मंदिराच्या आजूबाजूला जागा असणाऱ्या लोकांनी, या प्रकल्पासाठी आपल्या जागा सरकारला अधिग्रहीत करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. काशी विश्वनाथ मंदिर शतकानुशतकं चढ-उतार झेलत उभं आहे. दोन दशकांपूर्वी राणी अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वनाथ मंदिरासाठी केलेल्या कार्याचे त्यांनी स्मरण केले. त्यानंतर मंदिर आणि परिसराकडे सत्तेवर असलेल्यांनी फारसं लक्ष दिलं नाही असे पंतप्रधान म्हणाले.

काशी विश्वनाथ मंदिराजवळच्या सुमारे 40 मंदिरावर काही काळापासून अतिक्रमण झाले होते आता ही मंदिरे अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहेत. गंगानदी आणि काशी विश्वनाथ मंदिर यात थेट संपर्क जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प इतरांसाठी आदर्श ठरेल आणि काशीला नवी जागतिक ओळख देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1568271) Visitor Counter : 65


Read this release in: English