मंत्रिमंडळ

व्यावसायिक सुरक्षितता आणि आरोग्यक्षेत्रात सहकार्याविषयी भारत आणि जर्मनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 07 MAR 2019 8:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारत आणि जर्मनी यांच्यात व्यावसायिक सुरक्षितता आणि आरोग्य या संदर्भात झालेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. 13 नोव्हेंबर रोजी या कराराचे नूतनीकरण करण्यात आले होते.

लाभ:

 दोन्ही देशातील ह्या करारामुळे विविध वित्तीय कामांमध्ये व्यावसायिक सुरक्षितता आणि आरोग्य या क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान आणि उपाययोजनांचा लाभ दोन्ही देशांना झाला आहे. विशेषतः बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रातील आव्हाने आणि सुरक्षिततेच्या उपायांची माहिती भारताला जर्मनीकडून मिळाली आहे. दोन्ही देशातील सहकार्यामुळे भारतातील कामगार मंत्रालयाच्या अधीन असणाऱ्या विविध संस्था आणि कार्यालयांमध्ये क्षमता बांधणी आणि व्यावसायिक सुरक्षेविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. देशातील मोठ्या श्रमशक्तीला याचा फायदा होईल.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1568210) Visitor Counter : 46


Read this release in: English