मंत्रिमंडळ

एमएचईपी संबंधी कर्ज परतफेडीचा अवधी दोन वर्षांनी वाढवण्यासाठी भारत आणि भूतान दरम्यान कराराच्या अनुच्छेद 3 मधील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 07 MAR 2019 9:55PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मांग्डेछू जलविद्युत प्रकल्पासंदर्भात भारत आणि भूतान यांच्यातील कराराच्या अनुच्छेद 3 मधील दुरुस्तीला मंजुरी दिली आहे.

भूतानमध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भारताने दिलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी भूतानला दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली असून आता हा कालावधी 15 ऐवजी 17 वर्षे असेल.

लाभ :

या प्रस्तावाचा उद्देश पुढील बाबी सुनिश्चित करणे हा आहे-

भूतानमध्ये  720 मेगावॅट  एमएचईपी मधून विजेची आयात करण्यासाठी पहिल्या वर्षाचा दर 4.12 भारतीय रुपये प्रति यूनिट

एमएचईपी मधून भूतानकडून भारताला अतिरिक्त विजेचा निश्चित पुरवठा

भारत-भूतान आर्थिक संबंध आणि विशेषतः जलविद्युत सहकार्य क्षेत्रात परस्पर संबंध तसेच एकूणच  भारत-भूतान संबंध अधिक मजबूत बनवणे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1568198) Visitor Counter : 78


Read this release in: English