मंत्रिमंडळ

भारत आणि इंग्लंडदरम्यान कर्करोग संशोधन उपक्रमाविषयीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 07 MAR 2019 9:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि इंग्लंडदरम्यान कर्करोग संशोधन उपक्रमाविषयीच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. 14 नोव्हेंबर 2018 रोजी हा करार करण्यात आला होता.

सविस्तर माहिती:

भारत- इंग्लंड कर्करोग उपक्रमांतर्गत या आजाराच्या नियंत्रणात येत असलेले विविध अडथळे ओळखून त्यावर उपाययोजना केल्या जातील, कर्करोग प्रतिबंध, परवडणारी औषधे आणि कर्करोग रुग्णांची काळजी अशा विषयांवर इंग्लंडचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच या उपक्रमांतर्गत संयुक्त संशोधनासाठी निधी दिला जाईल.

निधीच्या पध्दती:

या उपक्रमांतर्गत पाच वर्षांसाठी 10 दशलक्ष पाउंड निधी दिला जाईल.

प्रभाव:

वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि अद्ययावत उपचार पध्दती येऊनही जगभरात आज कर्करोगामुळे वैद्यकीय खर्चाचा बोजा सर्वांवर पडतो आहे. भारत इंग्लंड दरम्यानच्या या कर्करोग संशोधन उपक्रमामुळे दोन्ही देशातील या क्षेत्रातले सर्वोत्तम संशोधक, शास्त्रज्ञ, आरोग्य संघटना आणि संस्था एकत्र येऊन एक बहु शाखीय संशोधन व्यासपीठ उपलब्ध केले जाईल. ज्यातून कमी खर्चात उच्च दर्जाच्या सेवा कर्करोगग्रस्तांसाठी उपलब्ध होऊ शकतील.

पार्श्वभूमी:

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेला जैव तंत्रज्ञान विभाग आणि इंग्लंडमधील कर्करोग संशोधन संस्था यांच्या समन्वयातून पाच वर्षांसाठी द्विपक्षीय संशोधानाविषयी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या या प्रायोगिक उपक्रमात भारत आणि इंग्लंड प्रत्येकी पाच दशलक्ष पाउंडची गुंतुवणूक करतील. गरज पडल्यास हा उपक्रम पुढेही वाढविण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एप्रिल 2018 मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यावेळी या कराराची घोषणा करण्यात आली होती.

 

S.Thakur/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1568193) Visitor Counter : 69


Read this release in: English