मंत्रिमंडळ

भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची  मान्यता

Posted On: 07 MAR 2019 7:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

भारताचे रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय आणि ऑस्ट्रियाचे परिवहन,नवकल्पना आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात रस्ते संरचना क्षेत्रातल्या तंत्रज्ञान सहकार्याबद्दल  झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

प्रभाव

यामुळे रस्ते परिवहन,रस्ते/महामार्ग पायाभूत विकास,व्यवस्थापन आणि प्रशासन,रस्ते सुरक्षा आणि आधुनिक परिवहन व्यवस्था यामध्ये द्विपक्षीय सहकार्य  करण्यासाठी प्रभावी ढाचा निर्माण करणे ह्या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.

लाभ

या करारामुळे, रस्ते परिवहन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढल्यामुळे रस्ते सुरक्षितता वाढण्याबरोबरच या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या शक्यता वृद्धिंगत होतील.परिवहन क्षेत्रात सहकार्य वाढल्यामुळे दोनही देशातले संबंध अधिक दृढ व्हायला मदत मिळेल.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1568186) Visitor Counter : 61


Read this release in: English