मंत्रिमंडळ

आयसीएआय आणि आयसीएईडब्ल्यू यांच्यात 2008 मधे स्वाक्षरी झालेल्या आणि 2014मधे नुतनीकरण करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची पूर्वलक्षी प्रभावाने  मान्यता

Posted On: 07 MAR 2019 8:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

आयसीएआय अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटसऑफ इंडिया  आणि आयसीएईडब्ल्यू  अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटस इन इंग्लंड एन्ड वेल्स  यांच्यात 2008 मधे स्वाक्षरी झालेल्या आणि 2014मधे नुतनीकरण करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने  मान्यता देण्यात आली.

लाभ-

या सामंजस्य करारामुळे अधिकाधिक युवा भारतीय चार्टड अकाउंटसना  आयसीएईडब्ल्यूची व्यावसायिक मान्यता घेण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून याद्वारे त्याना ब्रिटनमध्ये व्यावसायिक संधींचा लाभ  घेता येणार आहे. अनेक भारतीय चार्टड अकाउंटस,ब्रिटन मधे उच्च पदांवर काम करत आहेत ही अभिमानाची बाब आहे.

प्रमुख प्रभाव-

सदस्य,विद्यार्थी आणि त्यांच्या संस्था यांच्यात परस्पर हिताचे संबंध विकसित करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1568181) Visitor Counter : 51


Read this release in: English