पंतप्रधान कार्यालय

नागपूर मेट्रोला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 07 MAR 2019 7:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे नागपूर मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. खापरी-सिताबर्डी या 13.5 कि.मी. लांबीच्या नागपूर मेट्रो रेल्वे मार्गाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी डिजिटली बटण दाबून केले.

महाराष्ट्रातील नागपूर येथे दुसरी मेट्रो सेवा चालू झाल्याबद्दल व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की, वर्ष 2014 मध्ये नागपूर मेट्रोच्या पायाभरणी कार्यक्रम हा माझ्यासाठी विशेष क्षण होता. मेट्रोमुळे प्रवाशांना नागपूरमध्ये मूल्य आणि पर्यावरणात्मक मैत्रीचे वातावरण म्हणजेच सुखद प्रवास मिळणार आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, नागपूरच्या विकासासाठी  आणि भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र आणि  राज्य सरकार निरंतर कार्य करत होते. नागपूर मेट्रोमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि शहरांचा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आधुनिक दळणवळण पद्धतीमध्ये केलेल्या आमूलाग्र बदलांवर आणि प्राथमिकतेवर प्रकाशझोत टाकतांना पंतप्रधान म्हणाले की, मागील साडेचार वर्षामध्ये देशभरात 400 कि.मी.चे मेट्रोचे जाळे विस्तारले गेले असून 800 कि.मी. मेट्रो जाळे विकासाधीन आहे.

पंतप्रधानांनी ‘वन नेशन वन कार्ड, कॉमन मोबिलिटी कार्ड’चा शुभारंभ अलिकडेच केला असून त्याचे फायदे लोकांना मिळणे सुरू झाले असल्याचे सांगितले. भारतीयांची इतर देशांवर असलेले अवलंबित्व या विविध कार्डमुळे कमी झाले आहे.

 

B.Gokhale/P.Kor

 



(Release ID: 1568040) Visitor Counter : 162


Read this release in: English