मंत्रिमंडळ
भोपाळ विमानतळाची एएआयची अतिक्रमित 106.76 एकर जमीन मध्यप्रदेश सरकारला परत करण्याच्या एएआयच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
07 MAR 2019 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भोपाळ येथे एएआय म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणाची अतिक्रमित केलेली एएआय म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणाची 106.76 एकर जमीन मध्यप्रदेश सरकारला परत करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यापूर्वी 96 .59 एकर जमीन आधीच मध्य प्रदेश सरकारच्या ताब्यात देण्यात आली आहे. उर्वरित 10.20 एकर जमीन लवकरच एएआयला दिली जाईल.
लाभ:
एएआयच्या 106.76 एकर जमीन अतिक्रमण केलेल्या जागेच्या ऐवजी, मध्यप्रदेश सरकार 96.56 एकर जमीन देण्यासाठी सहमत आहे. ही जागा भोपाळ विमानतळाच्या जवळच आहे आणि एएआय ती विमानतळाच्या कामासाठी वापरु शकते. यामुळे एएआयच्या मालकीची 106.76 एकर जमीन, ज्याचा वापर मध्यप्रदेश सरकारने विविध उद्देशांसाठी केला आहे. या जागेच्या बदल्यात, एएआयकडे विमानचालन उद्देशांसाठी 95.56 एकर जमीन दिली जाईल.
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
(Release ID: 1568024)
Visitor Counter : 127