पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या वाराणसी, कानपूर आणि गाझियाबादला भेट देणार

Posted On: 07 MAR 2019 6:40PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी, कानपूर आणि गाझियाबादला 8 मार्च 2019 रोजी भेट देणार आहेत. पंतप्रधान राज्यातल्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करतील.

वाराणसी येथे पंतप्रधान काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतील. तसेच काशी विश्वनाथ मंदिराकडे येणारा रस्ता आणि सौंदर्यीकरण प्रकल्पाचे भूमिपूजनही करतील. दिनदयाळ हस्तकला संकुलात पंतप्रधान राष्ट्रीय महिला उपजिविका कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

कानपूर येथे पंतप्रधान पानकी ऊर्जा केंद्राचे उद्‌घाटन करतील.

गाझियाबाद येथे पंतप्रधान मेट्रोच्या दिलशाद गार्डन-शाहीर स्थळ या मार्गाचे उद्‌घाटन करतील.

विविध योजनांच्या लाभार्थींना ते प्रमाणपत्र वितरीत करतील.

 

B.Gokhale/J.Patankar/P.Kor


(Release ID: 1568021) Visitor Counter : 134
Read this release in: English