आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
बिहारमधल्या 1320 मेगावॅटच्या बक्सर औष्णिक विद्युत प्रकल्पासाठीच्या गुंतवणुकीला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2019 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2019
बिहारमधल्या, बक्सर जिल्ह्यातल्या 2x660 मेगावॅटच्या, सुमारे10,439.09 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या बक्सर औष्णिक विद्युत प्रकल्पासाठीच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात अत्याधुनिक उत्सर्जन नियमन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ऊर्जा निर्मितीसाठी, कमी इंधन वापरूनही उच्च क्षमता निर्मिती साध्य करण्यात येणार आहे. बक्सर प्रकल्पामुळे बिहार आणि पूर्व भागातली विजेची टंचाई कमी होणार आहे.
या प्रकल्पामुळे, संबंधित भागातल्या सामाजिक-आर्थिक विकासाबरोबरच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. बक्सर प्रकल्पामधून 2023-24पासून लाभ मिळण्यासाठी सुरवात होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1567989)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English