आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
उत्तर प्रदेशातल्या खुर्जा सुपर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2019 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2019
उत्तर प्रदेशातल्या, बुलंदशहर जिल्ह्यातल्या, 2x660 मेगावाटच्या, सुमारे 11,089.42 कोटी अंदाजित खर्चाच्या खुर्जा सुपर औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या, (एसटीपीपीच्या) अंमलबजावणीसाठीच्या गुंतवणुकीला मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली आहे. मध्य प्रदेशातल्या सिंग्रुळी जिल्ह्यातल्या अमेलिया कोळसा खाणीतील गुंतवणुकीलाही मंजुरी देण्यात आली.यासाठी 1587.16 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. खुर्जा प्रकल्पामुळे उत्तराखंड,राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांनाही लाभ होणार आहे.
या प्रकल्पामुळे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून बुलंदशहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला आणि पश्चिम उत्तर प्रदेशातल्या नजीकच्या जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. एसटीपीपीमधून 2023-24पासून लाभ मिळण्यासाठी सुरवात होणार आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1567967)
आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English