आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

जम्मू-काश्मीरमधल्या कीरु जल विद्युत प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 07 MAR 2019 3:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 मार्च 2019

 

जम्मू-काश्मीरमधे 624 मेगावाटचा कीरु जल विद्युत प्रकल्प उभारण्यासाठीच्या गुंतवणुकीला,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याअध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री  मंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे.सीव्हीपीपीपीएल म्हणजे चिनाब खोरे उर्जा प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडकडून  ही गुंतवणूक केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी 4287.59 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एनएचपीसी, कीरु प्रकल्पासाठी सीव्हीपीपीपीएल मधे 630.28 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवणार आहे.

जम्मू काश्मीर मधल्या किश्तवाड जिल्ह्यात चिनाब नदीवर हा प्रकल्प  होणार आहे.

 उत्तरी ग्रीड मधे अत्यावश्यक असलेली वीज या प्रकल्पामुळे उपलब्ध होणार असून राज्याच्या दुर्गम भागाच्या विकासाच्या प्रक्रियेला यामुळे गती मिळणार आहे. साडेचार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी  2019 मधे या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1567856) Visitor Counter : 64


Read this release in: English