रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
मोठ्या शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हायब्रीड सिम्युलेशनबाबतचा अहवाल सादर
Posted On:
07 MAR 2019 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मार्च 2019
मोठ्या शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हायब्रीड सिम्युलेशनचा वापर करण्यासंदर्भातला अहवाल आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सादर करण्यात आला. हायब्रीड मॉडेलची निर्मिती करून नवी दिल्लीतील वाहतूक कोंडी समाप्त करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोरण तयार करून त्याची चाचणी घेणे हा या पाहणी अहवालाचा मुख्य उद्देश होता. दिल्लीनंतर देशातल्या इतर महानगरांमध्ये अशाच प्रकारची मॉडेल्स विकसित करता येऊ शकतील.
दर दोन वर्षांनी समर्पक वाहतूक आकडेवारीनुसार हे मॉडेल अद्ययावत करता येईल, ज्यामुळे त्यानंतरच्या काही वर्षात ते उपयुक्त ठरू शकेल.
N.Sapre/J.Patankar /P.Kor
(Release ID: 1567855)
अभ्यागत कक्ष : 61