गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
सेवानिवृत्तीधारकांसाठीच्या घरांचे नियमन आणि विकासाबाबत सरकारकडून मार्गदर्शक तत्व जारी
Posted On:
06 MAR 2019 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2019
सेवानिवृत्तीधारकांसाठी आणि वयोवृद्धांसाठीच्या घरांच्या नियमन आणि विकासाबाबत गृहनिर्माण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची माहिती आज केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) हरदीप एस. पुरी यांनी दिली. ही घरं वयोवृद्ध स्नेही वातावरण, शारीरिक प्रमाणके आणि वैशिष्ठ्ये असणारी असली पाहिजेत. निवृत्त आयुष्य सुरक्षित आणि शुद्ध वातावरणात घालवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांच्या विशेष गरजांकडे लक्ष देऊन या व्यक्तींचे हक्क अबाधित ठेवण्याबद्दल या मार्गदर्शक तत्वात विशेष लक्ष पुरवण्यात आल्याचे पुरी यांनी सांगितले. या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्या पालकांसाठी राहण्याची जागा विकत घेऊ इच्छिणारे तसेच ज्येष्ठ नागरीक आणि कुटुंबियांसाठी मार्गदर्शक पर्याय देण्यात आले आहेत.
- सेवानिवृत्तीधारकांसाठीची घरे ही नॅशनल बिल्डींग कोडमधल्या तरतुदींशी साधर्म्य साधणारी असली पाहिजेत.
- वयोवृद्धांसाठी दृकश्राव्य माहिती फलक आणि सिग्नल यंत्रणा असणाऱ्या तसेच व्हील चेअर नेण्याची सुविधा असणाऱ्या लिफ्ट, स्नानगृह आणि जिन्यांवर घसरण्याला प्रतिबंध करणाऱ्या टाईल्स, स्वयंपाकघरात गॅस सुरू राहिल्यास सूचना देणारी प्रणाली, निवासस्थानं, लिफ्ट कॉरिडॉरमध्ये पॉवर बॅक अप सुविधा असाव्यात.
- अविरत/अखंड पाणी आणि वीज पुरवठा, योग्य स्वच्छता, सुरक्षा आदीची सोय
- किमान मूलभूत औषधोपचार, सोय, चोवीस तास रुग्णवाहिका सेवा, नियमित वैद्यकीय तपासणी, संकटकाळासाठी धोक्याची घंटा, सीसीटीव्ही कॅमेरे आदींची सोय
- सेवानिवृत्तांसाठीच्या घरातील रहिवासी हा 60 अथवा त्याहून अधिक वयाचा असावा.
- अशा घरांची सेवा पुरवणाऱ्यांची योग्य अधिकाऱ्यांकडे नोंदणी केलेली असावी आदी मार्गदर्शक तत्वांचा यात समावेश आहे.
B.Gokhale/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1567677)
अभ्यागत कक्ष : 185