रेल्वे मंत्रालय
रेल्वे भरती महामंडळाच्या लेव्हल/निकालांबाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे
लेव्हल-वन निकाल तयार करतांना कुठलीही नवी पद्धत वापरलेली नाही
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2019 4:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2019
रेल्वे भरती महामंडळाने 10 फेब्रुवारी 2018 रोजी 62 हजार 907 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. 1 कोटी 89 लाख 78 हजार 913 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. 17.09.2018 ते 17.12.2018 या 51 दिवसांत 152 मध्ये जगातील सर्वात मोठी संगणक आधारीत परीक्षा यशस्वीरित्या घेण्यात आली. या परीक्षेचे निकाल 4.03.2019 रोजी जहीर झाले.
केंद्रीकृत रोजगार अधिसूचनेअंतर्गत महत्वपूर्ण सूचनांच्या सातव्या परिच्छेदात उमेदवारांना मिळालेले गुण काही बाबींवर अवलंबून राहिले असे नमूद करण्यात आले होते.
रेल्वे भरती महामंडळाने जारी केलेले निकाल आणि त्यासाठी वापरलेली पद्धत याविरुद्ध उमेदवारांनी मोठ्या संख्येने दाखल केले आहेत. संगणकावर आधारीत परीक्षेसाठी कुठलीही नवी पद्धत अवलंबली नसल्याचे रेल्वे भरती महामंडळाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांची यादी त्यांच्या योजनेनुसार तयार करण्यात आली आहे.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1567645)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English