रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते उद्या तामिळनाडूत 5 हजार 10 कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2019 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या तामिळनाडूत 5 हजार 10 कोटी रुपयांच्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण तसेच पायाभरणी समारंभ होणार आहे.
वेल्लोर, थिरुवनलाई आणि विल्लूपुरम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 38 वरील 112 कि.मी. लांबीच्या मार्गाचा दुपदरीकरण प्रकल्प तसेच तिरुपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 381 वरील मार्गाचे चौपदरीकरण प्रकल्प राष्ट्राला अर्पण करतील.
पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 36 वरील विक्रावडी-सेमीयाथोप-चोलापूरम-तंजावूर भागातील 116.5 कि.मी. लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजनही होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील कांचीपूरम आणि वेल्लोर जिल्ह्यातील 36 कि.मी. मार्गाचे सहा मार्गिकाकरण तसेच वेल्लोर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वरील गुडीयानायन आणि वेल्लोर वळणरस्त्याचेही भूमिपूजन होणार आहे.
N.Sapre/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1567616)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English