अर्थ मंत्रालय

सुधारणांची प्रक्रिया सुरूच राहील, तसंच कमी कर दर आणि कर पायाचा विस्तार यांवर भर दिला जाईल-केंद्रीय अर्थमंत्री जेटली

Posted On: 05 MAR 2019 8:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2019

 

देशात सुधारणांची प्रक्रिया सुरूच राहील तसेच कमी कर दर आणि विस्तृत कर पाया यावर भर दिला जाईल असे सांगून विकासाचा वेग उच्च आणि सर्वसमावेशक ठेवण्याबाबत सरकार कटीबद्ध असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.

देशात व्यापार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगून जेटली म्हणाले की, यामुळे विकासाचा वेग कायम राहील. ते नवी दिल्लीत त्यांच्या कार्यालयात भारतीय उद्योग आणि व्यापार महासंघ अर्थात फिक्कीच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना बोलत होते.

विविध वस्तूंवरील दर कमी करण्याच्या जीएसटी परिषदेच्या शिफारशींची अंमलबजावणी करून त्यातील फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशातील व्यवसाय सुलभतेची प्रक्रियेचा विस्तार करून ती अधिक गतीमान करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांबाबतच्या सुधारणांची प्रक्रिया सुरूच राहील असे जेटली यांनी सांगितले.

नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे देशातील कर्जमध्ये बदल घडून आले असून वेगाने कर्ज वसुली करण्यासाठी बँकिंग क्षेत्राल सहाय्य होत असल्याचे ते म्हणाले. जीएसटी आता योग्य मार्गावर असून सरकार कमी कर दर आणि कर पायाचा विस्तार यावर भर देत असून महसूल संकलन वाढीला लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

थेट परदेशी गुंतवणुकीसाठी भारत आकर्षणाचे केंद्र असून भारतीय अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले. समाजातल्या दुर्बल घटकांसह सर्व घटकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor


(Release ID: 1567615)
Read this release in: English