पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 6 मार्च 2019 रोजी कर्नाटकातल्या कलबुर्गी आणि तामिळनाडूतल्या कांचीपूरमला देणार भेट
अनेक विकास प्रकल्पांचा करणार प्रारंभ
Posted On:
05 MAR 2019 6:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या कर्नाटकातल्या कलबुर्गी आणि तामिळनाडूतल्या कांचीपूरमला भेट देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे.
कलबुर्गी येथे पंतप्रधान कर्नाटकातल्या जनतेच्या फायद्यासाठी ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील विकास प्रकल्पांचा प्रारंभ करतील. तसेच आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशीही ते संवाद साधतील.
तामिळनाडूतल्या कांचीपूरम येथे पंतप्रधानांच्या हस्ते रस्ते, रेल्वे आणि ऊर्जा क्षेत्रातल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पांमुळे तामिळनाडूमधील रस्ते आणि रेल्वे क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील तसेच तामिळनाडूतल्या जनतेला अधिक चांगली, जलद आणि कमी खर्चिक वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
याशिवाय व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नई येथील डॉ. एमजी. रामचंद्रन यांचा पुतळा आणि महिलांसाठी डॉ. एमजीआर जानकी कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे व्हिडिओ लिंकद्वारे उद्घाटन करतील. तसेच कांचीपूरम येथे आयुष्मान भारत लाभार्थ्यांशी संवादही साधतील.
B.Gokhale/J.Patankar/P.Kor
(Release ID: 1567544)
अभ्यागत कक्ष : 77