पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय
स्वच्छ भारत ग्रामीण योजनेच्या स्वतंत्र पडताळणीत 96 टक्के स्वच्छतागृहांचा वापर होत असल्याची पुष्टी
प्रविष्टि तिथि:
05 MAR 2019 6:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2019
जागतिक बँक सहाय्य प्रकल्पाअंतर्गत एका स्वतंत्र पडताळणी संस्थेने हाती घेतलेल्या राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता पाहणी 2018-19 या पाहणीनुसार ग्रामीण भागातील 96.5 कुटुंब उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे. देशातल्या विविध राज्य आणि जिल्ह्यांमध्ये उघड्यावर शौचमुक्त म्हणून जाहीर करण्यात आलेल्या गावांपैकी 90.7 टक्के गावे आजही उघड्यावर शौचमुक्त असल्याची पुष्टी झाली आहे. नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत देशातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 6 हजार 136 गावांतल्या 92 हजार 40 कुटुंबांत ही पाहणी हाती घेण्यात आली होती.
या स्वतंत्र पडताळणी संस्थेने जागतिक बँक, युनिसेफ, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, नीती आयोग तसेच सांख्यिकी मंत्रालय आदींना आपला अहवाल सादर केला.
B.Gokhale/J.Patankar/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1567537)
आगंतुक पटल : 271
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English