पंतप्रधान कार्यालय

इंडिया टुडे परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 02 MAR 2019 7:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत इंडिया टुडे परिषदेला संबोधित केले.

स्वच्छ भारत अभियानाबाबत इंडिया टुडे समूहाने केलेल्या जनजागृती बद्दल त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान म्हणून आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीविषयी बोलताना,राष्ट्रीय स्तरावरचा सापेक्ष अनुभवाचा अभाव  म्हणजे अदृश्य वरदानच ठरल्याचे ते म्हणाले.

परराष्ट्र धोरणासंदर्भात घेण्यात येणाऱ्या शंकांचे उदाहरण घेत , गेल्या काही दिवसातल्या घटनांनी  या शंकांना पूर्णविराम मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  

आजचा भारत हा नवा भारत आहे, वेगळा भारत आहे.प्रत्येक सैनिकाचे जीवन मौल्यवान आहे कोणीही भारताला आव्हान देऊ शकत नाही.राष्ट्रहितासाठी प्रत्येक निर्णय घ्यायला सरकार कटीबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

देशातले आणि देशाबाहेरचे काही विशिष्ट घटक, जे देश विरोधात आहेत,अशा घटकांना, भारतात दिसून येणारी एकजूट पाहून धडकी भरली आहे.ही भीती खरे तर चांगलीच आहे.शत्रूला भारताच्या शौर्याची तर भ्रष्टाचाऱ्यांना कायद्याची भीती आहे आणि ही भीती चांगलीच आहे असे ते म्हणाले.नव भारताची जोमाने वाटचाल सुरु असून आपल्या क्षमता आणि संसाधनाविषयी त्याला आत्मविश्वास आहे.

सरकारच्या हेतूविषयी आणि सैन्य दलाविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांच्या पवित्र्याविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला.नरेंद्र मोदी यांना विरोध करताना या  विशिष्ट लोकांनी  भारतालाच विरोध करणे सुरु केले असून ते देशाला नुकसान पोहोचवत आहेत. ते भारतीय सैन्य दलाविषयी शंका उपस्थित करत आहेत मात्र भारतात दहशतवादाला चिथावणी देणाऱ्यांवर विश्वास ठेवत आहेत.     

ज्या राफेलवरून मोठे राजकारण करण्यात आले अशा  राफेल लढाऊ विमानांची उणीव भारतालाआत्ता जाणवत आहे. ज्यांच्या कृतीमुळे, देशाच्या सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होतो अशांवर त्यांनी जोरदार टीका केली. ज्यांच्या हातात अनेक वर्षे देशाची सत्ता होती त्यांना केवळ करारातच स्वारस्य होते अशी टीका त्यांनी केली. याचे सर्वात मोठे नुकसान जवानांचे आणि शेतकऱ्यांचे झाले.  

  काहींनी केलेल्या करारामुळे संरक्षण  क्षेत्राला तर ठोस धोरणाअभावी कृषी क्षेत्राचे नुकसान झाले.यामुळे गरीब हा गरीबच राहिला आणि राजकीय वर्गाच्या दयेवर अवलंबून राहिला.

 याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृषी कर्ज माफी.पीएम किसान सन्मान निधी, ही शेतकरी कल्याण सर्वंकष योजना म्हणजे शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीच्या सरकारच्या वेगळ्या दृष्टिकोनाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.जाहीर झाल्यानंतर 24 दिवसात ही योजना अमलात आल्याची माहिती त्यांनी दिली.

आपल्या सरकारचे 55 महिने आणि इतर सरकारचा 55 वर्षांचा कारभार म्हणजे प्रशासनाचे दोन विषम दृष्टीकोन आहेत.

त्यांचा टोकन तर आमचा टोटलअर्थात समावेशक दृष्टीकोन आहे.या संदर्भात त्यांनी सैन्य दलासाठी समान श्रेणी समान निवृत्तीवेतनयाबाबत घेण्यात आलेला पुढाकार,गरिबांची आर्थिक समवेशकता, उज्ज्वला  योजने अंतर्गत  स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन,सर्वांसाठी वीज आणि सर्वांसाठी घर यांची उदाहरणे दिली.

 या आधीपर्यंत भारत हागणदारीमुक्त का झाला नाही,अनेक दशकांपासून पोलीस स्मारक का बांधण्यात आले नाही असे  प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

भारत अतिशय वेगाने दारिद्र्यातून मुक्त होत आहे आणि भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे असे त्यांनी सांगितले.पायाभूत सुविधा वेगाने कशा विकसित करण्यात येत आहेत हे त्यांनी विषद केले.कायदा किंवा उपक्रम यांची कृतीशी सांगड घालण्यावर आपल्यासरकारचा विश्वास आहे.2014 ते 2019 हा काळ सर्वांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठीचा काळ राहिला तर 2019 च्या पुढचा काळ हा आशा-आकांक्षाची पूर्तता करण्याचा आणि प्रगतीची नवी शिखरे गाठण्याचा आहे असे पंतप्रधान म्हणाले. 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1567490) Visitor Counter : 65


Read this release in: English